Pune underground Metro Video : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत कधीच केला नव्हता अशा मेट्रोचा (Metro) प्रवास तुम्हालाही करता येणार आहे. कारण भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचं ट्रायल रन यशस्वी (Metro trial run successful) झाली आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा ही चाचणी करण्यात आली आहे. या भुयारी मेट्रोचा व्हिडिओ (underground metro video) समोर आला आहे. हा अनुभव सर्वप्रथम पुणेकरांना मिळणार आहे. कारण पुण्यातील (pune metro) भुयारी मेट्रोचं काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहेत.
पिंपरी चिंचवड ते स्वारगेट (Pimpri Chinchwad to Swargate) असा या 17.4 किलोमीटरचा मेट्रो मार्गवर हा भुयारी मार्ग आहे.
Pune metro goes underground for its trials.
Video and picture credits @metrorailpune @gau_dab @Explorer_Yash @Shaikh_Mohsin12 pic.twitter.com/ZaqXgjsOyx— Transit of Pune (@transit_of_pune) December 6, 2022
स्वारगेट ते शिवाजीनगर (Swargate to Shivajinagar) दरम्यान हा भुयारी मार्ग असून 85 टक्के काम पूर्ण झालं आहे. जमिनीपासून 28 ते 30 मीटर खोलीवर हा भुयारी मार्ग आहे. या मेट्रोमध्ये दोन भुयारी मार्ग आहेत. 6 किलोमीटर अंतराची ही भुयारे आहेत. (Pune underground Metro trial run successful video)
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी... #PUNE #Metro #news pic.twitter.com/dWtMuKlfjw
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) December 7, 2022
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट (Civil Court to Swargate) हा 3 किलोमीटर अंतराचा टप्पा शिल्लक राहिला आहे. तो लवकराच लवकर पूर्ण करण्याचं प्रशासनाचं ध्येय आहे. येत्या महिन्याभरात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट (Phugewadi to Civil Court) आणि वनाज ते सिव्हिल कोर्ट (Vanaj to Civil Court) हे दोन्ही मार्ग लवकरच पुण्याच्या सेवेत सुरु करण्याचे मानस आहे. दरम्यान नागपूर (Nagpur metro), मुंबई (mumbai metro) आणि पुण्यात मेट्रो यापूर्वीच मेट्रो धावत आहेत.