सांगली: सध्या राज्यात कोबी आणि फ्लॉवरचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सांगली जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतक-यांची अवस्था काही वेगळी नाही. शेतक-यांनी उसणवारी करुन कोबी फ्लॉवरची लागवड केली त्यासाठी महागडी खते आणि कीटकनाशकांची फवारणी केली. मात्र आता कोबी आणि फ्लॉवर काढणीला आला असून बाजारात कोबीच्या गड्डीला एक ते दोन रुपयांचा दर मिळत असल्यामुळं त्या शेतक-यांना उभ्या पिकावर रोटर फिरवलाय.