सिंंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या वडाचा पाट इथल्या शांतादुर्गा देवीच्या जत्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.
अहमदनगर पारनेर येथील खंडोबाची जत्रा सुरू झाली आहे. त्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वडाचा पाट इथल्या शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव दरवर्षी पौष महिन्यात साजरा होतो. पाच दिवस चालणा-या या उत्सवासाठी सिंधुदुर्गबरोबरच मुंबई, पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक इथं येतात.
माहेरवाशिणींची देवी म्हणूनही या देवीची ओळख आहे. पाच दिवसांच्या या यात्रेत होमहवन हा प्रमुख कार्यक्रम असतो. वडाचा पाट इथल्या जत्रोत्सवाच्या निमित्तानं लाखोंची उलाढाल होते. यात्रोत्सवाच्या निमित्तानं परिसरात चाकरमान्यांची मोठी गर्दी असते.