MLA Santosh Bangar : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. (Maharashtra Political News) शिंदे गटाचे (Shinde Group) आक्रमक आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) चांगलेच अडचणीत आले आहे. आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत प्राचार्यांना मारहाण करणं त्यांना चांगलच भोवलं आहे. शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News in Marathi) महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेसह 40 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Shinde group MLA Santosh Bangar in trouble, case filed against in Hingoli)
शिंदे गटाचे आमदार बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केली तसेच त्यांचा कानही पिरगळा होता. या मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. याआधीही संतोष बांगर यांनी मारहाण केल्याचे पुढे आले आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मारहाण प्रकरणी बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसचे महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांवरही या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हिंगोलीमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली होती. मारहाणीची ही घटना 18 जानेवारीला घडली असल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेनंतर प्रचार्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरुन बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Live Update :
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
हिंगोलीत प्राचार्यांना मारहाण करणं भोवलं
शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा
महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेसह 40 जणांवर गुन्हा
बातमी पाहा- https://t.co/mR58264rZE@santoshbangar_ #MaharashtraPolitics #EknathShinde pic.twitter.com/omef3vPHdF— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 28, 2023
शिंदे गटाचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर नेहमीच चर्चेत असतात. मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या होत्या, तेव्हा त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. त्यांनी शोतकऱ्यांसह पिकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती. बांगर यांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला फोनवरुन मारण्याची धमकीही दिली होती. मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा होती.