प्रवीण तांडेकर, झी 24 तास भंडारा : महाराष्ट्राची लेक आता चीनचं मैदान गाजवणार आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याची संधी या तरुणीला मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द गावाची ही तरुणी रहिवासी आहे.
सुशिकला आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आता थेट आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सुशिकलाचे वडील बांधकाम कामगार आहेत. त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपल्या लेकींला खेळण्याची जिद्द निर्माण केली.
मागच्यावर्षी हैदराबाद इथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक सुशिलाने मिळवलं होतं. जयपूरमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण व एक रजत पदक सुशिकलाने आपल्या नावावर केलं.
सुशिकला दिल्ली इथे पुढील स्पर्धेसाठी तयारी करत आहे. 18 ते 22 जून दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार आहे. 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी तिची तयारी सुरू आहे.