मुंबई : नाशिकमधल्या राणेनगरमधल्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या शिक्षकानं नववीच्या विद्यार्थिनीला अश्लील एसएमएस पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कदम असं शिक्षकाचं नाव आहे. सुनील कदमनं विद्यार्थिनीला प्रेमासाठी बळजबरी करत नापास करण्याची धमकीही दिली होती.
याप्रकरणी संतप्त पालकांनी सुनील कदमला शाळेतच चोप दिला. तसंच शाळा प्रशासन सुनील कदमला पाठीशी घालत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे. सुनील कदमनं यापूर्वीही मुली आणि महिलांची छेड काढल्याचा तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे पालकांनी आता गांभीर्याने पाहिलं आहे.