पुणे : TET परीक्षा घोटाळ्याचा (TET exam scam) मुख्य सूत्रधार तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या घरी आणखी 5 लाखांची रोकड सापडली. आतापर्यंत एकूण 3 कोटी 93 लाखांचे घबाड पोलिसांनी जप्त केले आहे. तुकाराम सुपे याची माया अजूनही संपता संपत नाही, असेच दिसून येत आहे. पुन्हा त्याच्या घरी 5 लाखांची रोकड सापडली आहे. त्याच्याबरोबर इतर अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आहेत.TET परीक्षा घोटाळ्यातील अटकेत असलेले परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडील रोकड हस्तगत करणे अजूनही सुरूच आहे.
सुपे याच्याशी संबंधित असलेल्याकडून तब्बल 33 लाखांची रोकड हस्तगत करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. सुपे आणि त्याच्याशी संबंधितांकडून रोकड हस्तगत करण्याची ही सहावी वेळ आहे. सुपेकडून आजवर हस्तगत करण्यात आलेल्या घबाडाची रक्कम 3 कोटी 93 लाखांपर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर आणखी काही रक्कम लवकरच हस्तगत होण्याची शक्यता आहे.
TET गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि परीक्षा परिषेदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी बनावट वेबसाईट तयार करून अपात्र उमेदवारांचे निकाल जाहीर करत पैसे उकळले, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडी 30 डिसेंबरपर्यंत वाढवली.
पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपे याच्या घरात पोलिसांना आतापर्यंत कोट्यवधींचं घबाड मिळाले आहे. मात्र या प्रकरणात एकट्या सुपेनांच त्रास दिला जात असल्याच त्यांच्या कुटूंबियांच म्हणणे आहे. पहिल्या दिवशी पोलीस येऊन 88 लाख घेऊन गेल्याचंही ते मान्य करत आहेत.