पुणे : TET Exam : टीईटी परीक्षा (Teacher Eligibility Test) घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. नाशिक आणि जळगावमधून या दोघांना अटक करण्यात आली आहे.नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक केली. (TET Exam: Two more arrested in TET exam scam case, arrested two persons from Nashik And Jalgaon)
या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून 3 कोटी 85 लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फेत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर सुरंजित गुलाब पाटील (50, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या दोघांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप ( 48, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (45 रा. लातूर) यांना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 4 कोटी 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.