सोनू भिडे, नाशिक- नासिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. लग्न करायचे असल्यास दारूचे व्यसन सोड असे वडिलांनी सांगितल्याने मुलाला राग आला यात वडील आणि मुलात जोरदार भांडण झाले. दोघांनी एकमेकावर लोखंडी पाईप ने मारहाण केली यात मुलगा मयत झाला असून वडील जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काय होते कारण
चांदवड तालुक्यातील नारायणखेडे येथे कारभारी रावबा ठोके हे त्यांच्या परिवारासोबत राहत आहेत त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी मोठा मुलगा प्रकाश, सून, दोन नातवंड आणि लहान मुलगा रवींद्र एकत्र राहत आहेत. घराजवळ असलेली शेती करून ते उदरनिर्वाह करत आहेत.
मोठ्या मुलाच लग्न झाल्यांनतर वडिलांना लहान मुलगा रवींद्र याचे लग्न करायचे होते. मात्र रवींद्रला दारू पिण्याच व्यसन होत. यामुळे त्याच्यासोबत लग्न करण्यास कोणी तयार नव्हते. रवींद्र याबाबत घरात नेहमी भांडण करत असे. वडील आणि रवींद्र यांच्यात नेहमी लग्नाबाबत वाद होऊ लागले. वडिलांनी त्याला अगोदर दारू सोड मग तुझे लग्न लावून देतो असे सांगितले होते. मात्र याचा राग कारभारी यांचा मुलगा रवींद्र याच्या मनात होता. २४ जुलै ला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सगळे शेतात काम करत असताना वडील कारभारी ठोके हे घरात झोपले होते. यावेळी रवींद्र याने वडिलांना लग्न बाबत पुन्हा विचारण केली मात्र वडिलांनी नकार दिल्याने रवींद्र याने वडिलांना शिवीगाळ केली. आणि जवळच असलेली लोखंडी पहार घेऊन वडिलांच्या डोक्यात मारून डोके फोडून दुखापत केली यानंतर वडिलांनी लोखंडी पाईपने आणि पहारीने मुलाच्या डोक्यावर आणि हातापायावर जबर मारहाण केली. यात रवींद्र याचा मृत्यू झाला असून वडील कारभारी ठोके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.