नागपूर- राज्याची क्राइम कॅपिटल अशी नको असलेली ओळख गुन्हेगारी घटनांमुळे नागपुरला मिळाली होती, खुनाच्या घटनांमुळे नागपूर काही महिन्यांपूर्वी चर्चेत रहायचे,मात्र आता शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आणण्याकरिता नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे,त्याचाच प्रत्येय फेब्रुवारी महिन्यात दिसून आला, शहरात फेब्रुवारीमध्ये एकही हत्येची घटना घडली नाही, त्यामुळे फेब्रुवारी महिना हा शांतीचा ठरला आहे।
गुन्हेगाराची राजधानी म्हणून ओळख असलेलं नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात झिरो मर्डरची नोंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे,नागपूर पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता ठोस उपाय योजना केल्या आहेत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागपूर शहर हे कसे गुन्हे मुक्त होईल यासाठी ठोस उपाय योजना आखल्या. शहरात जवळपास हत्येचा दरवर्षी 80 ते 100 घटना घडता,त्यानुसार दर महिन्यात 8 ते 10 हत्या होत असतांना गेल्या डिसेंबर मध्ये 5 हत्या तर जानेवारी महिन्यात 4 हत्या फेब्रुवारी महिन्यात 0 हत्येची नोंद झाली आहे.
असा लावण्यात आला गुन्हेगारावर अंकुश
हत्यांचा घटनांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्त्वाच्या उपाय योजना करत गेल्या वीस वर्षात दाखल असलेल्या हत्यांचा आरोपींची माहिती गोळा केली. आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच परिसरातील ठाणेदारांना हत्येचीची घटना रोखण्यासाठी तेथील हालचालींचा अभ्यास करून पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले,त्यानुसार गुन्हेगारांविरुद्ध मकोका, एमपीडीए,तसेच तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली,नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कारवाईत नागरिकांचे पण मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले आहे तसेच भविष्यातही पोलिसांना नागरिकांकडून अशाच सहकार्याची अपेक्षा केली आहे.