लातूर : लातूर शहरातील अल्पवयीन असलेल्या तीन सख्ख्या बहिणींवर ४५ वर्षीय नातेवाईकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय.
जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार गेल्या नऊ वर्षांपासून सुरु होता. अखेर पीडित मुलींनी हा सगळा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
विशिष्ट प्रकारचे स्प्रे मारून तो हा प्रकार वेगवेगळ्या वेळेला करत होता. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा असल्याचा आरोप यावेळी पीडित मुलीच्या आईने केलाय. चंद्रकांत वागलगावेचे पीडित मुलीच्या आईसोबत पूर्वीपासून सलोख्याचे संबंध होते. तसेच आरोपीने आपल्यासोबत कोर्टात लग्न केल्याचाही पीडित मुलीच्या आईचा दावा आहे.
या प्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही केलीय.