नाशिक : दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी अशी म्हण प्रचलित आहे. पशु धनाची पूजा करून पशुप्रति ऋण व्यक्त करण्याची परंपरा आहे.मनमाड शहरात दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुग्ध व्यवसाय करणारे गवळी बांधव रेड्याला सजवून- त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढून औक्षण करतात.
भाऊबिजेच्या दिवशी रेड्यांच्या टक्करिची अनोखी स्पर्धा घेण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. आज वाघदर्ड़ी रोड व बुधलवाड़ीच्या हिरा लॉन्स शेजारील मैदानावर रंगलेल्या रेड्यांच्या टक्कर स्पर्धेत अनेक रेडे सहभागी झाले होते.
रेड्यांच्या एकमेकांना झुंजण्याचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.रेड्यांच्या दंगलीत विजयी रेड्यांच्या मालकाना पारितोषिके देवून गौरविण्यात येते.