प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीचा निकाल थोडा उशीरा लागला. महाराष्ट्राच्या ९५टक्के निकाल लागला. यंदा अनेक विद्यार्थ्यांना मनासारखे गुण मिळाल्यामुळे कोरोनाच्या काळात थोडं आनंदाच वातावरण आहे. असाच आनंद कोल्हापूरातील फुलेवाडी परिसरातील नागरिकांना झाला आहे. या परिसरातील जुळ्या भावांना दहावीतही जुळे गुण मिळाले आहेत.
फुलेवाडी परीरात राहणाऱ्या प्रज्वल आणि प्रणित देसाई या जुळ्या भावंडाना दहावीच्या परीक्षेत ही समान मार्क मिळाले आहेत.दोघेही 500 पैकी 445 गुण मिळवत 89 टक्के मार्कांनी उत्तीर्ण झालेत. जुळ्या भावंडाना समान मार्क मिळाल्यान कुटुंबीय देखील आश्चर्यचकित झालेत. प्रणित आणि प्रज्वल दोघे ही फुलेवाडी इथल्या श्री गुरुदेव विद्यानिकेतन शाळेत शिकतात.
आता पर्यत एका ही इयत्तेत दोघांना समान मार्क मिळाले नव्हते. मात्र दहावीच्या परीक्षेत हा योग जुळून आलाय, असं त्यांचे पालक सांगतात. .विशेष म्हणजे परीक्षेत या दोघांचे नंबर वेगवेगळ्या ठिकाणी आले होते. दोन्ही मूल चांगल्या मार्कांनी पास तर झालीच शिवाय दोघांना ही एकसमान मार्क पडल्यान देसाई कुटुंबात दुहेरी आनंदच वातावरण आहे.
आयुष्यात चांगले योग जुळून येतात. जुळ्या मुलांच्या बाबतीत तर हे योगायोग पावलोपावली होत असतात. असाच एक योगायोग फुलेवाडीमधील जुळ्या मुलांच्या बाबतीत घडला आहे. या योगायोगा बाबतीत आश्चर्य व्यक्त केलं जातं..जुळ्या भावांना दहावीत पण जुळे गुण मिळाले आहेत. यामुळे आनंद गगनात मावत नाही.