औरंगाबाद : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. लातूर बीड आणि औरंगाबाद अशा तीन ठिकाणी ते बूथ प्रमुखांच्या बैठका घेणार आहेत. निवडणुकांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे बुधवार पासून काँग्रेसच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा मराठवाड्याच्या तुळजापूर मधून सुरू होतो आहे.
आगामी निवडणुका पाहता सगळ्याच पक्षांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट दिसतंय. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा मराठवाड्यात दोन ते तीन सभा घेतल्या तर सुप्रिया सुळे यांनी मराठवाडा ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला नेत्यांच्या सभा येणाऱ्या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यासाठीच आहे असं म्हणता येईल.