मुंबई : नाशिकच्या दिंडोरीत करंजवण धरण परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने दाक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. तेथील एका शेतकऱ्याची अडीच एक्करावरची काढणीला आलेली द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. त्यामुळे त्याचं 7 ते 8 लाखांचं नुकसान झालं आहे.
हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. भुसावळ, सावदा, रावेर या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे..गहू,मका, हरभरा, मुंग या पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.. ही स्थिती नाशिक जिल्ह्यात सुद्धा निर्माण झाली आहे. पश्चिम पट्टा आणि मोसम खोऱ्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय...
आज सकाळपासून पुन्हा या परिसरात अवकाळी पाऊस बरसतोय. . या पावसामुळे उन्हाळी कांदा, गहू ,हरभरा पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
आंब्याचा मोहरही गळून गेला आहे. मालेगावच्या वळवाडे शिवारात वीज पडून बैल ठार झाला. सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यातील साल्हेर ,मुल्हेर या आदिवासी भागांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला.. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.