नागपुरात बेरोजगारांची फसवणूक करणारे रॅकेट, दोघांना अटक

बेरोजगार युवकांची फसवणूक करणारं मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. 

Updated: Jun 27, 2017, 09:28 PM IST

नागपूर : बेरोजगार युवकांची फसवणूक करणारं मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. 

पंतप्रधान कौशल विकास योजनेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा पर्दाफाश नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केलाय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

नोकरीचं आमीष दाखवून शेकडो बेरोजगारांना गंडा घातल्याच पुढं आलय. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.