औरंगाबाद : नेत्यांनाही वंदे मातरम् नीट म्हणता येत नसल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांनीही वंदे मातरम् म्हणताना चुका केल्या, तर उपमहापौर स्मिता घोगरे यांचीही थोडी फार अशीच गत झाली.
माझा आवाज चांगला नाही म्हणून मी वंदे मातरम् म्हणू शकत नाही. आणि आमचे वंदे मातरम् तुम्हाला चालत नाही, हे वक्तव्य आहे, भाजप आमदार अनिल गोटे यांचे. हेच ते अनिल गोटे ज्यांनी विधान सभेत वंदे मातरमे म्हणावाचं लागेल, असं भाषण केलं होतं.
भाजपच्या लोकप्रतिनिधींना वंदे मातरम् म्हणता येतं का ? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याची सुरुवात अर्थातच आमदार अनिल गोटेंपासून केली. मात्र आम्ही संघाच्या शाखेत जे वंदे मातरम् म्हणतो ते इतरांना चालत नाही कारण त्यात भारत मातेचं वर्णन आहे, असं म्हणत आमदार गोटे यांनी मूळ विषयाला बगल दिली.
गोटे यांनी वंदे मातरम् तर म्हंटलेच नाही, त्याला कारण दिलं ते आवाजाचं. नेत्यांनाही वंदे मातरम् नीट म्हणता येत नसल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांनीही वंदेमातरम म्हणताना चुका केल्या, तर उपमहापौर स्मिता घोगरे यांचीही थोडी फार अशीच गत झाली.