Vasant More In Vanchit Bahujan Aghadi : राज ठाकरे यांच्या मनसेतून बाहरे पडलेल्या वसंत मोरे यांनी अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला आहे. बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील निवासस्थानी वसंत मोरे यांचा पक्ष प्रवेश झाला. वसंत मोरे यांनी पुण्यातून विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.
वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे पुण्याची लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी बोलणी सुरू होती. या चर्चेतून काही मार्ग निघण्याआधीच वसंत मोरे यांनी वंचितमध्ये अधिकृतरीते प्रवेश केला आहे. यावेळी आपणच ही निवडणूक जिंकू असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. पुण्यामध्ये वसंत मोरेंना वंचितनं उमेदवारी दिलीय. त्यामुळं काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचं भवितव्य धोक्यात आलंय.
भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल 25 उमेदवार मैदानात उतरवलेत. अकोल्यामधून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
अखेरचा जय महाराष्ट्र... साहेब मला माफ करा अशी भावनिक साद घालत पुण्यातले मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी पक्षाला रामराम केलाय. वसंत मोरे पक्षातल्या काही वरिष्ठांवर नाराज होते. अनेकदा त्यांनी ही खदखद बोलून दाखवली.. मध्यरात्री भावनिक पोस्ट करत मोरेंनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर काही तासातच मनसेचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरच वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय.. तेव्हा वसंत मोरे आता कोणाकडून लोकसभा लढवणार याचीच चर्चा सुरु होती. काही दिवसांआधीच वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर शरद पवार अपक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली. वसंत मोरे म्हणजेची पुण्यातली ओळख आहे.. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात वसंत मोरेंचा सक्रिय सहभाग राहिलाय.