सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक: हल्ली फोडाफोडी, लूटमारीच्या आणि चोरीच्या घटना (Crime News in Maharshtra) खूप वाढू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक प्रचंड चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या अशा घटना दिवसेंदिवस घडत असल्यानं अशांना (Crime News Today) आळा घालणंही खूप महत्त्वाचं आहे. परंतु सध्या अशाच एक प्रकार घडला आहे ज्यानं सगळ्यांना घक्का बसला आहे. (Vavi Police arrested seven house burglary suspects in Nandur Shingote)
नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे घरफोडी करणाऱ्या सात आरोपींना वावी पोलिसांनी अटक केलीये. सदर आरोपींकडून गुन्हयांमध्ये चोरून नेलेले सोन्याचे नेकलेस (Necklace), लक्ष्मीहार, गंठन, पॅन्डल, कानातले वेल, सोन्याची चैन, अंगठी (Rings), डोरले, नथ, झुबे, पोत असे एकुण 12 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत रुपये 5,69,970 रूपये, तसेच 8 मोबाईल फोन, 5 मोटर सायकली असा एकुण 9,02,445 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
सदर आरोपींनी 24 ऑक्टोबरला नांदूर शिगोटे येथे राहणाऱ्या संतोश कांगणे व साक्षीदार (Witness) रमेश शेळके यांचे घरामध्ये आरोपींनी दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला व लोखंडी पहार व चाकुचा धाक दाखवून काठीने मारहाण करून लाकडी (Bed) बेडमध्ये ठेवलेले सुमारे 139 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2,75,000/- असा एकुण 6,92,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता.
याप्रकरणी वावी पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांना जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे मालाविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी वरील गुन्हे केल्यानंतर सिन्नर व बारामती पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचेकडुन घरफोडी, चोरी व दरोडयाचे आणखी गुन्हें उघडकीस येण्याची शक्यता आहे असं नाशिक (Nasik Crime News) ग्रामीण चे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे.