Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांना शिवसेना शिंदे गटाकडून औंरगाबाद पश्चिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि राजू शिंदे यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सध्या आठवी फेरी अखेर संजय शिरसाट 6 हजार 863 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, सुरुवातीच्या काही फेऱ्यामध्ये संजय शिरसाट यांना कमी मते मिळाली. त्यानंतर संजय शिरसाट यांनी आठव्या फेरीत थेट 1360 मतांनी आघाडी घेतली. सध्या नवव्या फेरीत संजय शिरसाट पुन्हा लिड घेताना दिसत आहेत.
विजय शिवतारे विजयी
यावेळी पुरंदर विधानसभा मतदारसंघात तिंरगी लढत बघायला मिळाली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे विजयी झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत त्यांना 125819 मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय जगताप होते. त्यांना यावेळी 101631 मते मिळाली.
2019 च्या निवडणुकीचे निकाल
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत संजय जगताप यांना 1,30,710 मते मिळाली, तर विजय शिवतारे यांना 99,306 मते मिळाली. या निकालाने पुरंदरमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाचे संकेत दिले आणि शिवसेनेविरुद्ध काँग्रेसची मजबूत पकड म्हणून या निकालाकडे पाहिले गेले.