Ratnagiri Crime: अनैतिक संबंधामध्ये आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा प्रकार पत्नीने केलाय. प्रियकराच्या मदतीने तिने हा प्रताप केलाय. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून केलाय.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणे गावात एक संतापजनक प्रकार समोर आलाय. प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केलाय. ती एवढच्यावरच थांबली नाही तर तिने पतीचा मृतदेह विहिरीत फेकला. नेहा निलेश बाक्कर असे मृताच्या पत्नीचे नाव असून ती 32 वर्षांची आहे. तसेच मंगेश चिंचघरकर असे तिच्या प्रियकराचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे. या दोन्ही आरोपींना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गिम्हवणे गावात सलून व्यवसाय करणारे निलेश बाक्कर सोमवारी बेपत्ता झाले होते. यासंदर्भातील तक्रार त्यांच्या भावाने दापोली पोलिस ठाण्यात दिली होती. पुढे पोलिसांनी तपासाची सुत्रे हाती घेतली आणि निलेश यांची पत्नी नेहा बाक्करकडे चौकशी केली. पण पोलिसांना नेहाच्या जबाबात तफावत आढळून आली. म्हणून तिच्यावर संशय अधिक बळावला. मग पोलिसांनी आपल्या स्टाइलने तपास सुरू केला आणि खळबळजनक माहिती त्यांच्या हाती लागली.
हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेहाच्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी नेहा ही प्रियकर मंगेश चिंचघरकरसोबत दिसून आली. याचदरम्यान एका बियर शॉपमध्ये नेहाने बियर खरेदी केल्याचेही फुटेजमध्ये आढळले. पुढील तपासात तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला बियरच्या माध्यमातून नशेत ठेवून त्याचा खून केला असल्याचे उघड झाले.
खून केल्यानंतर पत्नी नेहाने प्रियकर मंगेश यांच्या मदतीने पती निलेश यांचा मृतदेह पालगड पाटील वाडी परिसरातील विहिरीत फेकण्यात आल्याचे पोलस तपासाच समोर आले. पोलिसांनी या मृतदेहाचा शोध घेतला. यानंतर मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
घटनेतील दुसरा आरोपी मंगेश चिंचघरकर हा मंडणगड डेपोत बस चालक म्हणून काम करतो. त्याला दापोलीत सापळा रचून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नेहा आणि मंगेश यांनी हा कट रचला होता. या प्रकरणातील कटात अन्य कोणी सहभागी आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्यानंतर नेमके काय झाले? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.