पक्षी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आगळा-वेगळा उपक्रम

तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला.. असं म्हणून मकर संक्रातच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन वर्षभर गोडगोड संवादाची पेरणी करण्याची साथ घातली जाते. पण हा सण फक्त तिळगुळापुरताच मर्यादित न ठेवता एका कलाकाराने त्यातून नवीन उपक्रम सुरु केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 13, 2018, 06:34 PM IST
पक्षी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आगळा-वेगळा उपक्रम title=

कल्याण : तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला.. असं म्हणून मकर संक्रातच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन वर्षभर गोडगोड संवादाची पेरणी करण्याची साथ घातली जाते. पण हा सण फक्त तिळगुळापुरताच मर्यादित न ठेवता एका कलाकाराने त्यातून नवीन उपक्रम सुरु केला आहे.

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अस संदेश देणारी मकर संक्रांत आली. परंतु हा सण केवळ तिळगुळ आणि गोडगोड बोलण्या पुरता मर्यादित न ठेवता "आपल्या वागण्यामुळे पर्यावरण आणि पशु पक्षी यांवर संक्रांत येणार नाही याची काळजी घेऊया " असा संदेश एका कलाकाराने दिलाय. 

विक्रमादित्य घाग नावाच्या या कलाकराने पत्र लेखनाने हा असा अभिनव उपक्रम सुरु केला आहे . आजच्या फेसबुक आणि व्हाट्स अॅपच्या जमान्यात पत्र लेखन ही तशी दुर्मिळ बाब आहे. परंतु याच गोष्टीला आपल व्यक्त होण्याचं माध्यम बनवलय विक्रमने. 

खरंतर मराठी भाषेतून पत्र लेखन करून त्यातून दसरा, दीपावली सारख्या सणांना शुभेच्छा लिहिणं असा उपक्रम गेल्या ५ वर्ष्यापासून तो नित्य नियमाने करत आहे. सुरुवातीला आपले नातेवाईक, मित्र मंडळी पुरता मर्यादित असलेलं त्याचं काम आता विविध  सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था, कलाकार, अंध ,दिव्यांग विध्यार्थी ,विद्यालय अश्या सर्वांना शुभेच्छा देण्या एवढं वाढलं आहे. प्रत्येक सणासुदीला किमान ३५० ते ४०० पत्र तो पाठवतो आणि अख्या म्हणजे अॅनिमेटर म्हणून जॉब करत तो हे उपक्रम करत असतो. 

मुंबई सारख्या शहरात सर्व राज्यांच्या भाषिकांची सरमिसळ झाल्याने मराठी भाषा सुद्धा वेगळ्या अर्थाने समृद्ध होत आहे. परंतु त्यात हिताचा मराठमोळे पण आणि शुद्ध स्वरूप जपणं गरजेचं आहे. कारण" भाषा मरता देश ही मरतो, संस्कृतीचा दिवा विझे" अश्या सुंदर कवितेच्या ओळी आहेत. मराठीचा वैभव तर स्वतः ज्ञानेश्वरांनीच सांगितलं आहे.  आणि हाच विचार ठेवून मराठी शुभेच्छा पत्रांचा उपक्रम सुरु केल्याचं विक्रमने सांगितलं. 

आता या सर्व उपक्रमाला पर्यावरणाशी जोडत त्याने आपल्या आजुबाजुला दिसणाऱ्या पक्षी प्राण्याविषयी, त्यांचा परिसर जपण्यासाठी, त्या बद्दल जागृती करण्यासाठी संदेश द्यायला सुरुवात केलीय. बुलबुल, चिमणी, पिला, तांबट, धनेश [हॉर्नबिल] अश्या विविध पक्ष्यांची स्केचेस काढून" आपल्या वागण्यामुळे त्यांच्या वर संक्रांत येऊ नये अशी काळजी घेऊ या " अश्या प्रकारचं भावनिक आवाहन तो त्यातून करतोय.

पर्यावरण जागृती खरंतर एक चळवळ आहे,. नुकत्याच  हे काम नाही याची विक्रमला जाणीव आहे म्हणूनच अश्या पद्धतीने पर्यावरण प्रेमींची संख्या वाढवणं हे काम तो या उपक्रमातून करतोय. ५ वर्षांच्या या प्रयत्नाचा परिणाम ही आता दिसायला लागलाय. काही ज्येष्ठ नागरिक संघ, व्यक्ती, मित्र ,मैत्रिणी यांनी देखील आता अशा प्रकारे पत्र लेखन सुरु केल्याचं विक्रमला कळवलं आहे. पर्यावरण असेल तर आपण असू या स्पष्ट संकल्पनेवर आधारित काम करणं हे मोठं आव्हान आहे, परंतु अशा उपक्रमांद्वारे आपण ही खारीचा वाटा उचलावा असं विक्रमचं मत आहे. त्यांच्या या उपक्रमाला झी 24 तासच्या शुभेच्छा. तुम्हीही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क करा विक्रम घाग -9730794018 

पाहा व्हिडिओ