मुंबई : पुढचे चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज रत्नागिरी चिंब भिजणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलाय. 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
15 ते 18 नोव्हेंबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे.
14-18 Nov,राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता;कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यात शक्यता.काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता @RMC_Mumbai
17 Nov आसपास कमी दाबाचे क्षेत्र पू्र्व-मध्य अरबी समुद्रात, द.महाराष्ट्र-गोवा तटीय भागात निर्माण होण्याची शक्यता https://t.co/eAIy8vzk7e
- IMD pic.twitter.com/dsZIlE22RM— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 14, 2021
शेतकरी आणि बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढे चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस राज्यात पाऊस असणार आहे.
Raining here near Tal Indapur, Dist #Pune
Latest satellite, at 11 pm obs indicate partly cloudy sky over Indapur (Pune) and adjoining districts. pic.twitter.com/i98wYC6j3m— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 14, 2021
पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. 17 नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.