यवतमाळ : २००५ साली वाहून गेलेला पूल आणि रस्ता अजूनही न बांधल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात हिवरदरी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात शिप नदीला पूर आला की हिवरदरीचा संपर्क तुटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पाण्यातून जावं लागतं. गावात कोणी आजारी पडलं तर अक्षरशः खाटेवर झोपवून पाण्यातून रूग्णाला नेलं जातं.
विद्यार्थी आणि ग्रामस्थांची देखील आज प्रचंड गैरसोय होते आहे. दोन वर्षांपूर्वी पुरात नदी ओलांडणाऱ्या दोन मुली वाहून गेल्या. मात्र त्यांचा थोडक्यात जीव वाचवला. संतापलेल्या ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कारही घातला. तरीही उपयोग झालेला नाही. अखेर ग्रामस्थांनी नदी किनारी आंदोलन सुरू केलं आहे.