मुंबईत २.८ कोटी रूपयांचा अंमली पदार्थ साठा जप्त

दोघा ड्रग्ज तस्करांकडून तब्बल २ कोटी ८ लाख रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय. 

Updated: Nov 1, 2017, 10:07 PM IST
मुंबईत २.८ कोटी रूपयांचा अंमली पदार्थ साठा जप्त  title=

मुंबई : दोघा ड्रग्ज तस्करांकडून तब्बल २ कोटी ८ लाख रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय. 

पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकानं सायन भागात सापळा रचून या दोघा ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतलं. गौतमसिंग ओमकारसिंग आणि बंटी अली कुदरत अली अशी त्या दोघांची नावं असून, ते दोघंही राजस्थानचे राहणारे आहेत. 

त्यांच्याकडं २  किलो ८० ग्रॅम वजनाचं हेरॉईन सापडलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली साठ्याची किंमत तब्बल २ कोटी रूपये इतकी आहे. त्या दोघांनाही येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.