मुंबई : दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे यंदा ३८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते पाटणा-नागपूर, एलटीटी ते सावंतवाडी, साईनगर शिर्डी, थिविम आणि पुणे ते मनधुद या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.
०१०३७ एलटीटी-सावंतवाडी स्पेशल गाडी ५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी रात्री १.१० वाजता सुटणार असुन सावंतवाडीला त्याच दिवशी दुपारी १.२० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०३८ सावंतवाडी-एलटीटी स्पेशल गाडी ५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटणार असुन एलटीटी दुसऱ्या दिवशी रात्री १२.२० वाजता पोहचणार आहे. ०१०४५ एलटीटी-थिविम स्पेशल गाडी २ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार असुन थिविमला त्याच दिवशी दुपारी १.५० वाजता पोहचणार आहे.
तसेच ०२०३१ सीएसएमटी -नागपूर स्पेशल ट्रेन ८-२२ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री ११.५५ वाजता सुटणार असुन दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहचणार आहे. ०११३५ एलटीटी ते साईनगर शिर्डी स्पेशल ट्रेन ८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री १२.४५ वाजता सुटणार असून त्याच दिवशी सकाळी ७.३० वाजता साईनगर शिर्डी येथे पोहचणार आहे.
०२०५३ सीएसएमटी ते पाटणा सुपरफास्ट ट्रेन २ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी दुपारी २.२० वाजता सुटणार आहेत