मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी. राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील अंदाजे 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. दोन वर्षांनंतर ही परीक्षा होणार आहे. याआधी 2018-19मध्ये शेवटची परीक्षा घेण्यात आली होती. 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य असणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार