मुंबई : निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने माहीम येथून एका टॅक्सीतून ३ कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. याप्रकरणी माहीम पोलीस तपास करत आहेत. काळ्या पिवळ्या टॅक्सीत २ व्यक्तींकडून ही रोकड जप्त केली आहे. जप्त केलेल्या रकमेत विविध देशांचे चलन असल्याचे पुढे आले आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
विदेशी चलनाचे भारतीय मूल्य सुमारे तीन कोटी रुपये इतके असल्याची माहिती माहीम विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांनी दिली.
Maharashtra: A team of Election Commission has seized foreign currencies of multiple countries from 2 people in Mahim area of Mumbai. Total value of the seized foreign currency is Rs 3 Crore. Further action is being taken.
— ANI (@ANI) April 11, 2019
या विदेशी चलनाप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे चलन नेमके कोणत्या कारणासाठी आणण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.