मुंबई : बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी घोषणा केली आहे की, भारतीय लष्कारातील शहिद जवानांच्या पत्नींना आणि देशातील शेतकरी विकासासाठी आर्थिक मदत करणार आहे. बिग बी पोलिओ निवारण आणि स्वच्छ भारत अभियानात सक्रीय आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन एकूण २ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर १ कोटी रुपये शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी आणि १ कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी देणार आहेत.
यासाठी अमिताभ यांनी व्यक्तिगत पातळीवर एक टीम स्थापन केली आहे. जो देण्यात आलेला पैसा योग्य ठिकाणी वापरला जात आहे की नाही? अमिताभ यांचे हे करण्यामागील कारण आहे की, त्यांच्यामाध्यमातून केलेले कार्य आणि दिलेले योगदान सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि यातून एक सशक्त भारत होण्यास मदत झाली पाहिजे.
अमिताभ यांच्या मते शेतकरी आणि सैनिक समाजासाठी महत्वपूर्ण अंग आहे. आपल्याला भारताबाबत गर्व झाला पाहिजे आणि या लोकांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली पाहिजे. याआधी अमिताभ यांनी आंध्र प्रदेश आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी मदत केलेय. दरम्यान, या मदतीबाबत अमिताभ यांनी कोणतीही प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त केलेले नाही.