मुंबई : आज भाऊबीज म्हणजे भाऊ आणि बहिणीचा दिवस... या नात्याचं महत्त्व अतिशय खोल आहे. भाऊराया कायम आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी तिच्या भविष्यासाठी विचार करत असतो. अशाचं सर्व भाऊरायांकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मागणी केली आहे. सोशल मीडियावर एक गाणं पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे. "तिला जगू द्या..." असं या गाण्याचं नाव आहे.
आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे-
तिला शिकू द्या
जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या
समाज भक्कम करायचा असेल तर
तिला आधी सक्षम होऊ द्या.#दिवाळी च्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत-तिला जगू द्या https://t.co/eOY2BE0O8D #bhaidooj2020 #BhaiDuj pic.twitter.com/17cfvdQE9A— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 16, 2020
अमृता फडणवीस यांनी गाणं पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'तिला शिकू द्या...जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या...समाज भक्कम करायचा असेल तर, तिला आधी सक्षम होऊ द्या...' अशी मागणी त्यांनी आजच्या मुहूर्तावर सर्व भाऊरायांना केली आहे.
शिवाय, "दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या..." असं देखील त्या म्हणाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे.
आज स्त्रिया पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रत्येत क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. तरी देखील स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, अत्याचार यांसारख्या गुन्हाचे प्रमाण वाढत आहे. म्हणून अमृता फडणवीस यांनी सगळं टाळण्याचं आवाहन त्यांच्या नव्या गाण्यातून केलं आहे.