मुंबई : संपूर्ण जगात असे कोट्यवधी लोक आहेत जे लठ्ठपणामुळे खूप त्रस्त आहेत आणि लठ्ठपणा कमी करण्याचा विचार करतात, परंतु ते तसे करू शकत नाहीत. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी देखील काही महिन्यांपूर्वी लठ्ठपणामुळे चर्चेत होता. पण त्यांने जेव्हा वजन कमी केले तेव्हा अनेकांनी त्यांचं कौतूक केलं.
लठ्ठपणामुळे मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने स्वतः 108 किलो वजन कमी केले. एका मुलाखतीत नीता अंबानींनी त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितले, मुकेश अंबानीची पत्नी नीता अंबानी म्हणाल्या की, अनंत 18 वर्षांचा होता, तेव्हा एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आई मला तुझी मदत पाहिजे आहे. वजन कमी करण्यासाठी जर तू मला मदत कर.'
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सांगितले की, अनंत जॅमर येथे गेला, जेथे रिलायन्सचा रिफायनरी प्लांट आहे, अनंत तेथे 500 दिवस राहिला आणि दररोज 23 किमी धावत असे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे वजन 108 किलो कमी झाले.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ फायनलमध्ये होता, त्यावेळी मी अनंतला सांगितले की, टीम जिंकली तर त्याची ट्रॉफी घ्यायला जा, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी म्हणाल्या की, आयपीएलच्या दरम्यान जेव्हा फोटो समोर आले. तेव्हा लठ्ठपणाबद्दल लोक ट्रोल करू लागले, माझ्यासाठी आणि अनंतसाठी ते खूप वेदनादायक होते, अनंतच्या वयाबद्दल बोलायचे तर, तो तेव्हा 15-16 वर्षांचा होता.