मुंबई : आता पावसासंदर्भात (Maharashtra Monsoon Update 2022) महत्त्वाची बातमी आहे. राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस सांगण्यात आला आहे. तर मुंबईसह आसपासच्या परिसरात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊसाचा अंदाज आहे. (maharashtra monsoon update 2022 moderate to heavy rain is likely in in the next three 3 Heavy rain warning in some parts of konkan vidarbha and west maharashtra)
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर आणि मुंबईतही काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, साता-यात घाट भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक, नंदूरबारमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूरमध्ये मुसळधार आणि अकोला अमरावती, वर्ध्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसंच मराठवाड्यात जालना, हिंगोली, नांदेड, परभणीत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.