अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर, २५ जुलैला निदर्शने

अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर जाणार आहेत. मानधनवाढीच्या मुद्द्यावर, कृती समितीने ११ पासून संपाची हाक दिलेय. २५ जुलै रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 22, 2017, 11:59 PM IST
अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर, २५ जुलैला निदर्शने  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर जाणार आहेत. मानधनवाढीच्या मुद्द्यावर, कृती समितीने ११ पासून संपाची हाक दिलेय. २५ जुलै रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत.

अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनवाढीचा निर्णय व्हावा या व इतर मागण्यांसाठी येत्या ११ सप्टेंबर रोजी राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर जाणार आहे.  

तीन महिन्यांपासून थकीत मानधनाची मागणी करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत. राज्यात अंगणवाडी सेविकांना महिन्याला पाच हजार, मदतनिसाला २५०० रुपये मानधन दिले जाते. 

केंद्राच्या ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांच्या आहाराच्या रकमेत वाढ करावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल ते जून असे सलग तीन महिन्यांचे मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.