एसटी कामगारांचं आर्थिक नुकसान सदावर्ते भरुन देणार आहेत का? अनिल परब यांनी फटकारलं

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल परब यांचं पुन्हा एसटी कामगारांना आवाहन

Updated: Apr 7, 2022, 12:29 PM IST
एसटी कामगारांचं आर्थिक नुकसान सदावर्ते भरुन देणार आहेत का? अनिल परब यांनी फटकारलं title=

मुंबई : 22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत., संपकरी यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाची दिशाभूल करु नये, असे सांगत न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारलं. 

न्यायालयाने राज्य सरकारलाही सांगितलं आहे की आतापर्यंत तुम्ही इतक्यावेळा संधी दिली आहात, आता आणखी एकदा त्यांना कामावर येण्याची संधी द्या. त्या अमुषंगाने 22 तारखेपर्यंत कामावर येण्याची संधी कामगारांना दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. 

जे कामगार 22 तारखेपर्यंत कामावर रुजु होतील त्यांना कामावर घेतलं जाईल. कामगारांवरच्या सर्व कारवाया मागे घेतल्या आहेत, ज्या कामगारांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची चौकशी पोलीस करतील. पण परिवहन मंडळ त्या कामगारांना कामावर घेईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

एसटी प्रचंड आर्थिक नुकसानीत गेलीत आहे. एसटीला चांगले दिवस यायचे असतील कामावर या असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब य़ांनी केलं आहे.

गेले पाच महिने संपावर असलेल्या एसटी कामगारांना पगार मिळालेला नाही. त्याचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. त्यांनी त्यांचा लढा सुरु ठेवावा, पण काम बंद करु नये. कुणाला न्याय हक्क मिळू नये असं आम्ही कधीच कोणाला म्हटलेलं नाही. पण एसटीला, महाराष्ट्राच्या जनतेला वेठिला धरून असं करु नका, असं आवाहनही अनिल परब यांनी केलं आहे. 

ज्या कामगारांचं गेले पाच महिने आर्थिक नुकसान झालं ते सदावर्ते भरून देणार नाहीत, किंवा ज्यांनी भरीस घातलं तेही भरून देणार नाहीत, पण यापुढे नुकसान होणार नाही याची काळजी कामगारांनी घ्यावी, एसटी कामगारांबाबत परिवहन मंडळ सहानभूतीचं धोरण ठेऊन आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.