मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. दरम्यान, दिल्लीत गेलेले खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे खडसे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. तसेच खडसे हे चाचपणी घेत आहेत. त्यामुळे खडसे काय निर्णय घेणार याचीही उत्सुकता आहे.
नाराज एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह काँग्रेसचीही नजर असल्याचे पुढे आले आहे. खडसे आमच्या पक्षात आले तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलीय. खडसेंमुळे काँग्रेस बळकटी मिळेल असंही थोरातांनी नमूद केलं. खडसेंकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आलेला नाही आणि पक्षानंही तसी प्रस्ताव दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे आणि शिवसेनेने एकत्र काम केले असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत विशेष काही नसल्याचे मंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे. तर इथं कुस्त्या सुरू नसून राज्याच्या हितासाठी प्रकल्पांचा आढावा घेतला जात असल्याचा टोला शिंदेनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. तर दुसरीकडे नाराज पंकजा मुंडे यांचीही भेट खडसे भेट घेणार आहेत.
Breaking news । नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य, भाजपनं त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी, थोरातांचा टोलाhttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/8ugPnu367H
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 10, 2019
नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. काल खडसेंनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांकडे मतदारसंघातील काही प्रकल्पांबाबत चर्चा केल्याची माहिती खडसेंनी दिली. मात्र सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या गेल्यात. पक्षात डावललं जात असल्यानं खडसे व्यथित झालेत. तर दसुरीकडे भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन मुलीच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या पक्षातल्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी खडसेंनी केली.