ऑक्टोबर महिना सुरु होऊनही अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. अचानक झालेल्या परतीच्या पावसामुळे पावसाचं पाणी जलाशयात जात आहे. यामुळे नागरिकांना अस्वच्छ आणि गढूळ पाण्याचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेना उकळून आणि गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे.
भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 3 ते 4 दिवसांमध्ये सातत्याने पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे.
मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त नागरिकांकडून आल्या आहेत. गढूळता कमी करण्यासाठी महानगरपालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till#MumbaiRains #MyBMCUpdates pic.twitter.com/oDtJcTaxFP— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 23, 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्त्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्त्रोतापैकी भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गत 3 ते 4 दिवसांत जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याची गढूळता दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पासून वाढली आहे, असे निदर्शनास आले आहे.
मुंबई महानगरातील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त झाल्या आहेत. पाण्यातील गढूळता कमी करण्याकरिता महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे.
या बाबी लक्षात घेता, नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्त झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.