Mumbai Clean Up Marshals News In Marathi : मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पसरलेली अस्वच्छता रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा क्लीन मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि डेब्रिज फेकण्यास मनाई असताना काही लोकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान 24 वॉर्डामध्ये टप्प्याटप्प्यात 720 क्लीनअप मार्शलची नियुक्ती होणार असून शहर गलिच्छ करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शल योजना यापूर्वीच सुरू केली होती. मात्र याकारणास्तव ही योजना बंद पडली. मात्र आता ही योजना पुन्हा सुरू होत असून उघड्यावर घाण करणारे, कचरा फेकणारे यांवर आता 'क्लीनअप' मार्शलची नजर असेल. पालीकेच्या वॉर्डात 'क्लीनअप मार्शल'ची नियुक्ती करण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणारे तसेच घाण करणाऱ्यांवर आता क्लीनअप मार्शल 200 ते एक हजार रुपये दंड आकारतील.
पहिले आठ ते दहा दिवस दंडात्मक कारवाईची पोचपावती दिली जाणार असून त्यानंतर दंडाची वसुली ऑनलाइन केली जाणार आहे. ॲप विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
महानगरपालिकेने मार्शलची नियुक्ती खासगी संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या दंडात्मक कारवाईतून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा महापालिकेलाही मिळणार आहे. जेवढी दंड आकारणी होईल त्यातील 50 टक्के उत्पन्न पालिकेला मिळेल तर 50 टक्के उत्पन्न संबंधित संस्थेला मिळणार आहे. त्यामुळे हे मार्शल बारकाईने नागरिकांवर लक्ष ठेवणार आहेत.
कोरोनाच्या काळात तोंडावर मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले असते. मात्र 'क्लीनअप मार्शल' बेकायदेशीर दंड वसूल करत आहे अश्या तक्रारी पालिकेकडे येत होत्या. त्यानंतर त्यांचा करार रद्द करण्यात आला. सध्या शहरात ‘क्लीनअप मार्शल’ नसल्यामुळे मुंबईतील रस्त्यावर कचरा टाकून प्रदूषण निर्माण करताना दिसत मुंबई महापालिकेला निर्दशनात आले. म्हणून महापालिकेने क्लीनअप मार्शल नियुक्तीचा निर्णय घेतला.
कोरोनाच्या दोन वर्षात 'क्लीनअप मार्शल'ने चेहऱ्यावर मास्क घातलेल्या 40 लाख लोकांवर कारवाई करून 80 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 'क्लीनअप मार्शल'कडून दंड वसूल करताना काही वेळा नियम मोडणाऱ्यांकडून तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.