मुंबई : शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. येत्या 24 तासांत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेन वर्तवली आहे.
दरम्यान, या पावसाचा शेती पिकांना फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची विशेष काळजी घ्यावी. शेतात असलेला आणि शक्य असलेला शेतीमाल सुरक्षित कसा ठेवता येईल याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. अवेळी येणारा हा पाऊस शेतीसाठी तोट्याचा ठरू शकतो.
दरम्यान, तुरळक पावसासोबतच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.