दीपक भातुसे / मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधि सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.
BreakingNews मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार । विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधि सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 14, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत.