मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केली. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊन करण्याचे संकेत देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. पण पुन्हा लॉकडाउनला विरोधी पक्ष भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील विरोध दर्शवलेला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं @CMOMaharashtra
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2021
कोरोनाचा वाढता उद्रेक पाहाता आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती मनसेकडून ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली.
शिवाय मनसेने एक पत्र देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन संदर्भात होणाऱ्या हलचाली पाहाता पुन्हा लॉकडाऊन लागू होतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.