मुंबई : कोरोनाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी हॉस्पिटलच्या सुविधाही तितक्याच सुसज्ज असायला हव्यात. त्यातल्या त्यात हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटची संख्या पुरेशी हवी अशी चर्चा सातत्याने होतात. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतल्या बहुतांश हॉस्पिटल्समध्ये व्हेंटीलेटरच शिल्लक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटर आहेत पण ते आधीच्या रुग्णांना लावलेले आहेत.त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी जर व्हेंटीलेटरची गरज भासली तर अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सध्या अनेक रुग्णालयांमध्ये व्हेंटीलेटरच शिल्लक नसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे.यात बीएमसीच्या अनेक हॉस्पिटलचा समावेश आहे. कोरनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सरकारने मोठ्या प्रमाणात व्हेंटीलेटर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.
केईम हॉस्पिटल २२५
सायन हॉस्पिटल १२६
जेजे हॉस्पिटल ८९
भाभा हॉस्पिटल १७
राजवाडी हॉस्पिटल १३
व्ही एन देसाई हॉस्पिटल १५
डॉ आंबेडकर हॉस्पिटल ३०
लिलावती हॉस्पिटल ४४
हिंदू महासभा हॉस्पिटल १०
हिरानंदानी हॉस्पिटल १६
एसआरसीसी हॉस्पिटल १८
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय धक्कादायक माहिती. कोरोनाग्रस्त रूग्णांची राज्यातील संख्या ही १०१ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.