देवनार कचरा भूमीला पुन्हा आग, धुराने नागरिक हैराण

देवनार कचरा भूमीला पुन्हा एकदा आग लागली आहे. परिसरात धुराचं साम्राज्य पसरले आहे.  

Updated: Mar 7, 2019, 05:55 PM IST
देवनार कचरा भूमीला पुन्हा आग, धुराने नागरिक हैराण title=
संग्रहित छाया

मुंबई : देवनार कचरा भूमीला पुन्हा एकदा आग लागली आहे. परिसरात धुराचं साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना या आगीचा प्रचंड त्रास होत आहे. दरम्यान, आगीच्या घटना रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलींचं उल्लंघन झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. याआधीही येथे आग लागली होती. त्यावेळी विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला होता. तसेच आग लागल्यानंतरही बराच वेळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले नव्हते. त्यामुळे आग लागली की लावली याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

मुंबईच्या देवनार कचरा भूमीला पुन्हा एकदा आग लागली आहे. ही आग एवढी मोठी आहे की आजूबाजूच्या परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे, 2016 नंतर लागलेली ही मोठी आग आहे. दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या छोट्या आगीने बघताबघता रौद्ररूप धारण केले आणि आजूबाजूच्या परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 

2016 रोजी लागलेल्या आगीनंतर उच्च न्यायालयाने नियमावली आखुन दिली होती. त्यानुसार आतमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही ,संरक्षक भिंत, याचे प्रयोजन करण्याचे महापालिकेला कळविले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. आग लागल्यानंतरही बराच वेळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले नव्हते. त्यामुळे आग लागली का लावली याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. मागील वेळेला लागलेल्या आगीत अटक केलेले आरोपी अजूनही जेलची हवा खात आहेत. दरम्यान ही आग विझण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.