Drinking Water in Mumbai:मुंबईतील पिण्याचे पाणी 99.34% शुध्द आहे.

मुंबईतील पिण्याचे पाणी 99.34% शुध्द आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला  "जल निर्मलता" पुरस्कार देण्यात आलाय.

Updated: Mar 14, 2021, 10:23 PM IST
Drinking Water in Mumbai:मुंबईतील पिण्याचे पाणी 99.34% शुध्द आहे. title=

मुंबई :  मुंबई शहराला खूप धकाधकीचं शहर मानल जातं इथे कोणीच कोणासाठी थांबत नाही, प्रत्येक जण आपल्याच आयुष्यात रमलेला असतो. इथे कोणाची स्वप्न पूर्ण होतात तर कोणाला रात्री उपाशी झोपाव लागतं. पण या सगळ्यात मुंबई महापालिका मात्र आपलं काम नित्याने करत राहते आणि त्यामुळे पाणी  पुरवठ्यात मुंबई शहरात देशात सर्वोत्तम ठरलंय. मुंबईतील पिण्याचे पाणी 99.34% शुध्द आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला  "जल निर्मलता" पुरस्कार देण्यात आलाय.

नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्यासाठी तंत्रज्ञान, कुशल प्रशासन आणि उच्च प्रतीच्या व्यवस्थापनाचा विचार या सर्व गोष्टी सांभाळणाऱ्या महापालिकांना इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे पुरस्कार दिला जातो. 2019-20 वर्षासाठी सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील 21 शहरांमध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासण्यात आले. त्यामध्ये मुंबईतील वरळी, करीरोड, शिवडी; पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, जोगेश्वरी तसंच पूर्व उपनगरातील पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. त्यातील सर्व नमुने 47 मानकांकरीता योग्य आढळलेत. याची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली आणि मुंबई शहर महापालिकेला "जल निर्मलता" पुरस्कार देण्यात आला.

काय आहे नामांकन प्रक्रिया?

मुंबई महापालिकेकडून  दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याच्या पुरवठा नागरिकांना केला जातो.

निवडक 358 ठिकाणे जल विभागाने पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी निश्चित केली आहेत.

आरोग्य व गुणनियंत्रण (जलकामे) विभागाकडून रोज 110 ते 130 ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत 'मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक' (एमएफटी) मार्फत, अचूक तंत्रज्ञानाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार तपासले जातात.

दादर येथील चाचणी प्रयोगशाळेला डिसेंबर 2020 मध्ये नॅशनल बोर्ड ऑफ लेबोरेटरीजचे नामांकन प्राप्त झाले आहे.

मुंबई महापालिकेचे  प्रयत्न
2013-14 ते  2019-20 या कालावधीत पालिकेतर्फे जुन्या झालेल्या  250किमी लांबीच्या जलवाहिन्या (watre pipes)बदलण्यात आल्या.

1 लाख 75 हजार ठिकाणांच्या गळती शोधून दुरुस्त करण्यात आल्या.

रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत 89 हजार 908 ठिक-ठिकाणी जलवाहिन्या जोडण्यात आणि बदलण्यात आल्या.

2012 ते 2018 पर्यंत वेरवेरळ्या जल बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले. जल अभियंता विभागातर्फे करण्यात आले आहे.