Sanjay Raut : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena Ubt) नेचे तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी ईडीच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी ईडीनं कोर्टात केली. त्यावर आता 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहेत. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (patra chawl scam) संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 100 दिवस संजय राऊत या प्रकरणी आर्थर रोड कारागृहात (arthur road jail) होते.
संजय राऊतांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. 9 नोव्हेंबरला विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला. यानंतर तब्बल 102 दिवसांनी संजय राऊत जेलमधून बाहेर आले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ करणाकी घडामोड घडली होती. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने कथित शौचालय घोटाळा प्रकरणी अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणात ही अपडेट समोर आली आहे.
जेल मधून बाहेर आल्यावर पुन्हा एकदा संजय राऊत आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. ते सातत्याने भाजप तसेच शिंदे गटाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवत आहेत. संजय राऊत पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. तर, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी 2024 पर्यंत संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार असं विधान केले आहे.