मुंबईत सर्वसामान्यांच्या प्रवाशांसाठी लोकल ही लाईफलाइन म्हणून ओळखली जातो. नोकरीच्या निमित्ताने रोज हजारो चाकरमानी प्रवास करत लोकलने प्रवास करत मुंबईत दाखल होत असतात. कर्जत, विरार, नवी मुंबई अशा ठिकाणांहून प्रवास करताना चाकरमान्यांना फार कसरत करावी लागते. खचाखच गर्दीने भरलेल्या या लोकलमध्ये कधीकधी तर पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळेच मग यातून अनेकदा वाद निर्माण होतात. अनेकदा हे वाद हाणामारीपर्यंत जातात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सर्वसामान्यांसाठी लोकलने प्रवास करणं म्हणजे कमी पैशात मोठा पल्ला गाठण्याची प्रवासी साधन आहे. या लोकलमध्ये अनेकांशी मैत्री होते. त्यांचे ग्रुप तयार होतात, मग गप्पा, भजनं असे कार्यक्रम सुरु होतात. अनेकांसाठी लोकल म्हणजे थकवा घालवत दोन सुखाचे क्षण घालवण्याचं ठिकाण असतं. पण काहींसाठी मात्र तो रोजचा एक संघर्ष आहे. याच संघर्षातून वाद होतात आणि अशाच एका वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन प्रवासी अगदी फ्री स्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु असतो. पण नंतर दोघे चक्क रस्त्यावर उभे असल्याप्रमाणे हाणामारीच सुरु करतात. बसण्यावरुन हा वाद सुरु असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. याचवेळी एक तरुण प्रवासी मध्यस्थी करतो आणि दोघांना एकमेकांपासून दूर करत भांडण सोडवतो. यानंतर ट्रेनमधील इतर प्रवासीही त्यांची समजूत काढतात आणि भांडण न करण्याचा सल्ला देत शांत करतात. पण यानंतरही दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरुच असतो.
Just a Normal daily scene inside a crowded #MumbaiLocal
Loved the Super Cool Referee.. pic.twitter.com/i0X9yAperP
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 1, 2023
Mumbai Matters या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'गर्दीने भरलेल्या मुंबईच्या लोकलमधील आणखी एक सामान्य दिवस. रेफ्री मात्र खूप आवडला,' अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली असून भांडण सोडवणाऱ्या तरुणाचं कौतुक केलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी अनेक मेसेजही केले आहेत.
एका युजरने कमेंट केली आहे की, "दोन भांडणाऱ्या प्रवाशांमध्ये हस्तक्षेप करून त्यांना दूर ढकलणाऱ्या एका चांगल्या नागरिकाच्या कृतीचं कौतुक आहे." तसंच दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, 'ज्या तरुणाने मध्यस्थी केली आणि हे भांडण वाढणार नाही याची काळजी घेणाऱ्या तरुणाची बॅग त्याच्या पोटावर दिसत आहे हे आश्चर्यकारक नाही. हे तेच आहेत जे पाऊस, उष्णता सगळं सहन करतात'.