मुंबई : कोरोनाचा मुकाबला करताना राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील मृत्यूदर घटला असून गेल्या १५ दिवसांत जागतिक सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर ४.४० टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. तर जागतिक मृत्यूदर ६.९० टक्के इतका आहे. ही चांगली बाब असून राज्यातील १४ हॉटस्पॉटमध्येही घट आलेली आहे. आता केवळ पाचच ठिकाणे हॉटस्पॉट आहेत, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे,चाचण्या केल्या जात आहेत,सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 22, 2020
याआधी जागतिक सरासरीच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर जास्त असल्याचे आकडेवारी दर्शवत होती. मात्र आता बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे. आज हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर ४.४० टक्के आहे तर जागतिक मृत्यूदर ६.९० टक्के इतका आहे. राज्यात कोरानाबाधितांची संख्या ६४२७ इतकी झाली. आजपर्यंत ७७८ नव्या रुग्णांची भर पडलीय. राज्यात बळींची संख्या २८३ इतकी झाली आहे. तर ८४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
BreakingNews । महाराष्ट्र राज्यासाठी दिलासादायक बातमी । राज्यातील मृत्यूदर घटला । गेल्या १५ दिवसांत जागतिक सरासरीच्या तुलने मृत्यूदर ४.४० टक्के । जागतिक मृत्यूदर ६.९० टक्के#Corona @CMOMaharashtra @OfficeofUT #coronavirus #CoronaInMaharashtra @ashish_jadhao@rajeshtope11
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 24, 2020
मुंबई - ४२०५
पुणे - ९१०
ठाणे - ५९५
पालघर - १३०
नाशिक - १२०
नागपूर - १००
रायगड - ५०
औरंगाबाद - ४०
सोलापूर - ३३
अहमदनगर - ३२
सांगली - २६
बुलढाणा - २४
मुंबई - ४१३
पुणे - १७७
ठाणे - ८९
सांगली - २६
पालघर - २०
रायगड - १७
अहमदनगर -१६
औरंगाबाद - १५
नागपूर - १३
बुलडाणा - ११
यवतमाळ - १०
मुंबई - १६७
पुणे - ६२
ठाणे - १५
नाशिक - ९
औरंगाबाद - ५
पालघर - ४
सोलापूर - ३
अहमदनगर - २
धुळे - २
जळगाव - २
सातारा - २
रायगड - १
नंदुरबार - १
सांगली - १
रत्नागिरी - १
अकोला - १
अमरावती - १
बुलढाणा - १
नागपूर - १