मुंबई : मुंबईतल्या पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष म्हणजे आरोपपत्रात पहिल्यांदाच मुंबई पोलिसांनी व्हिसलब्लोअर शब्दाचा वापर केला आहे. पीएमसी बँकेतला एखादा वरिष्ठ अधिकारीच हा व्हिसलब्लोअर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तब्बल ३२ हजार पानांच्या या आरोपपत्रात ५ जणांची नावं आरोपी म्हणून नोंदवलेली आहेत. जॉय थॉमस, वरयाम सिंह, सुरजीत सिंह अरोडा, राकेश वधावन आणि सारंग वधावन अशी त्यांची नावं आहेत.
दुसरीकडे पीएमसी बँकेच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मालमत्तेच्या लिलावासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय.
पीएमसी बँक घोटाळ्यामुळे ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. बँकेच्या मालमत्तेचा लिलाव करून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.