मुंबई : नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला भीषण आग लागली आहे. गुरूवारी रात्री ९ च्या सुमारास मॉलला भीषण आग लागली. आतापर्यंत तब्बल ५०० लोकांपेक्षा जास्त जणांची सुटका करण्यास प्रशासनाला यश मिळालं आहे. गेल्या ११ तसांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या बचाव कार्यामध्ये अग्निशामन दलाचे २ कर्मचारी मात्र जखमी झाले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. शिवाय ६ वॉटर टँकर ६ रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत. सुमारे २५० आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
मॉलला लागलेली आग अत्यंत भीषण असल्यामुळे मुंबईच्या सर्व अग्निशमन दलाच्या केंद्राकडून गाड्या मागवण्यात आल्या आहेत. प्रसंगी काही खासगी यंत्रणा देखील मदतीसाठी पुढे आल्या आहेत. या आगीमुळे मॉलचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसऱ्या मजल्यावरील मोबाईलच्या दुकानाला लागलेल्या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. सिटी सेंटर मॉल तिन मजल्याचा आहे.
#WATCH: Firefighting operation underway at a mall in Nagpada area in Mumbai where a fire broke out last night.
It has been declared a level-5 fire. #Maharashtra pic.twitter.com/YDpgpRHXcm
— ANI (@ANI) October 23, 2020
मोबाईल शॉपला आग लागल्यामुळे तिसऱ्या मजल्यावर देखील आग लागली. २०० पेक्षा जास्त दुकानांना आगीचा फटका बसला आहे. यामध्ये मोबाईलच्या दुकानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोट्यावधीचं नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, आग विझवण्याच्या कामामध्ये अडथळा येवू नये म्हणून पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. आगीची तिव्रता लक्षात घेता बेलसिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.