मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी मार्केट MCX उघडताच सोन्याच्या दरात 0.23 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर चांदीतही 0.16 टक्क्यांनी वाढ दिसून आली. मुंबईत गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ नोंदवली जात आहे. आजही बाजारात थोड्या फरकाने सोन्याने भाव खाल्ला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पुरवठा, कोरोना संसर्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर येणारा ताण, राज्यांमधील लॉकडाऊनची स्थिती याचा परिणाम स्थिथी याचा परिणाम सोन्याच्या दरांवरही होत असतो. त्यामुळे सोन्याच्या दरांत आजही वाढ नोंदवली गेली.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 350 रुपये प्रतितोळा इतका आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 48 हजाराच्या आसपास असलेल्या सोन्याचा भाव आज 49 हजाराच्या पुढे गेला आहे.
गुंतवणूकदारांना अद्यापही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. कारण सोन्याचा भाव यापेक्षाही वाढण्याची शक्यता आहे.