मुंबई : दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे ३ रूपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता शेतक-यांना तीन रुपयांनी वाढीव दर मिळणार आहे.
मात्र याचा बोजा ग्राहकांवर टाकणार नसल्याचं दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं दूधसंघांच्या नफ्याला कात्री लागणार आहे. त्यामुळं दूध संघाच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. यासंदर्भात सर्व दूधसंघांना निर्देश देण्यात आले आहेत.
दूधसंघांनी निर्देशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा जानकरांनी दिलाय. महागाई निर्देशांक जसा वाढेल तसे दुधाचे दर वर्षातून एकदा वाढणार आहे.